कन्हैय्या कुमार बिहारमधून लोकसभा लढवणार

283

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांने २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.  निवडणूक लढवण्याबाबत सर्व डाव्या संघटनांशी त्यांने चर्चा केली असून बिहारच्या बेगूसराय येथून सीपीआयच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीकडून कन्हैय्या कुमार हा बेगुलसराय येथून लोकसभा निवडणूक लढवेल. कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीला लालू प्रसाद यादव यांनाही   होकार दिला आहे. मात्र, अद्याप कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.  क न्हैय्या कुमारनेही यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या बेगुलसराय लोकसभा मतदारसंघातून भाजपचे भोला सिंह प्रतिनिधीत्व करत आहेत.

कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) आपल्या १२५ जणांच्या राष्ट्रीय परिषदेत कन्हैय्या कुमारचा समावेश केला होता. या परिषदेत  कन्हैया कुमारची निवड झाल्यानंतरच कन्हैय्या राष्ट्रीय राजकारणात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या संघटनांनी महाआघाडी स्थापन केली, तर मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे कन्हैया कुमारने म्हटले होते.