कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य

201

मुंबई, दि.७ (पीसीबी) – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा झाला आहे. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचारही आरोपींचा जागीच एन्काऊंटर केला आहे. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवले आहे.

तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे कौतक केले जात आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चारही आरोपींच्या एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे.

WhatsAppShare