कट मारल्याचा जाब विचारणा-यास दगडाने बेदम मारहाण

83

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – एका व्यक्तीने दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वाराने कट मारल्याचा जाब विचारला. यावरून दुचाकीस्वाराला दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी लिंकरोड, चिंचवड येथे घडली.

प्रवीण भगवान माने (वय 36, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालाजी वाईकर (रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून पिंपरीकडे जात होते. लिंकरोड, चिंचवड येथे रिलायन्स मॉल समोर आरोपीने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे फिर्यादी यांनी कट मारल्याचा जाब विचारला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून दगडाने डोक्यात, हातावर आणि पायावर मारून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare