कंपनीमधून सव्वा लाखांचे साहित्य चोरीला

20

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – कंपनीच्या ओपन शेडमध्ये ठेवलेले एक लाख 20 हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 24 जून रोजी सकाळी म्हाळुंगे येथील मेटालिक्स क्रायोजेनिक लिमिटेड कंपनीत उघडकीस आली.

अनिरुद्ध अनिल बेलन (वय 25, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथील मेटालिक्स क्रायोजेनिक लिमिटेड कंपनीत फिर्यादी बेलन नोकरी करतात. त्यांच्या कंपनीच्या ओपन शेडमध्ये एक लाख 20 हजार रुपयांचे 438 सर्कल नग ठेवले होते. 23 जून सायंकाळी साडेसहा ते 24 जून सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare