कंपनीतून दोन लाख 35 हजारांचा माल चोरीला

58

भोसरी, दि.८ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून दोन लाख 35 हजार 201 रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत भोसरी एमआयडीसीतील सायनाक हायड्रोलिक्स कंपनीत घडली.

सुरेंद्र नारायणराव सायनाक (वय 65, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. 7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या सायनाक हायड्रोलिक्स कंपनीत गेट वरून प्रवेश केला. त्यानंतर अज्ञात चोरट्याने कंपनीमधून दोन लाख 35 हजार 201 रुपयांचा माल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक घिगे तपास करीत आहेत.

WhatsAppShare