कंपनीतील सहकारी तरुणीचा पाठलाग; नातेवाईकांना फोटो पाठवून बदनामी

53

चिखली, दि. 15 (पीसीबी) : कंपनीतील सहकारी तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिला वारंवार फोन करून तिचा पाठलाग केला. तरुणी आपल्याला टाळत असल्याचे जाणवल्याने तरुणाने तरुणीसोबतचा फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार एप्रिल 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत भोसरी आणि चिंचवड येथे घडला.

साईनाथ म्हेत्रे (रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी भोसरी येथील एका कंपनीत काम करत होते. कंपनीत ओळख झाल्यानंतर आरोपीने तरुणीसोबत जवळीक वाढवली. ही बाब तरुणीच्या लक्षात आल्याने तिने आरोपीला टाळण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोपी हा तरुणीला वारंवार फोन करून पाठलाग करू लागला. तरुणीने आरोपीचा फोन उचलणे बंद केल्याने त्याने फिर्यादी सोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात काढलेला फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली. याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare