कंपनीतील मटेरियल चोरताना चार महिलांना पकडले

189

चाकण, दि. ९ (पीसीबी) – कंपनीतून भंगार साहित्य चोरून नेताना चार महिला आढळून आल्या. त्यांच्या विरोधात घरफोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) पहाटे साडेतीन वाजता कुरुळी येथील गुरु कृपा एंटरप्रायजेस कंपनीत घडली.

देविका शामू राठोड (वय 35), सुनीता संतोष पवार (वय 25), बानू शाबुद्दीन शेख (वय 55), संगीता रवी चव्हाण (वय 24, सर्व रा. बीडवस्ती चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी भाईराम रामजग वर्मा (वय 35, रा. कुरुळी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा हे गुरुकृपा एंटरप्रायजेस या कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतात. आरोपी महिलांनी गुरुकृपा एंटरप्रायजेस या कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. कंपनीतून आठ हजार 900 रुपये किमतीचे 98 किलो भंगारचे साहित्य चोरून नेताना फिर्यादी यांना आढळल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.