कंपनीच्या छताचा पत्रा कापून सव्वासात लाखांची चोरी

134

चाकण, दि. ९ (पीसीबी) – कंपनीच्या छताचा पत्रा कापून अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून सात लाख 22 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 8) मध्यरात्री एक ते सकाळी साडेसहा या कालावधीत वाघजाईनगर, चाकण येथील अंकुर इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन वर्क या कंपनीत घडली.

अनिल पोपट शिंदे (वय 36, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या अंकुर इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन वर्क या कंपनीच्या छताचा पत्रा कापून कंपनीच्या पॅसेजमध्ये प्रवेश केला. पॅसेजच्या दरवाजाचे कुलूप तोडून कंपनीतून सात लाख 22 हजार रुपये किमतीचे स्पेअर पार्ट आणि ऍक्सेसरीज चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.