कंपनीच्या कंपाउंडचा पत्रा कापून सव्वासात लाखांची चोरी

229

देहूरोड, दि. ११ (पीसीबी) – कंपनीच्या कंपाउंडचा पत्रा कापून अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून सात लाख 24 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 9) रात्री अकरा ते मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत विठ्ठलवाडी, देहूगाव येथे घडली.

गणेश हनुमंतराव निकम (वय 47, रा. मोशी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या कंपनीच्या वॉल कंपाउंडचा पत्रा कापून कंपनीत प्रवेश केला. चार लाख 54 हजार 68 रुपयांचे इलेक्ट्रिक केबल, दीड लाखांच्या जुन्या केबल, 40 हजार रुपये किमतीचा टीव्ही, 50 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप, 10 हजारांचा एक डीव्हीआर, 20 हजारांचे दोन एल जी कंपनीचे डेस्कटॉप मॉनिटर असा एकूण सात लाख 24 हजार 68 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.