कंपनीचा दरवाजा तोडून केला आत प्रवेश; आणि चोरून नेली चक्क ‘हि’ वस्तू

47

खेड, दि. २४ (पीसीबी) – कंपनीच्या पाठीमागचा पत्र्याचा दरवाजा तोडून सव्वा दोन लाखांचे स्पेअर पार्ट चोरीला गेले आहेत. शुक्रवारी (दि. 23) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास म्हाळुंगे, चाकण याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अनिरुद्ध अनिल बेलन (वय 38, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कंपाऊंडवरुन उडी मारुन कंपनी परिसरात प्रवेश केला. आरोपींनी कंपनीच्या पाठीमागचा पत्र्याचा दरवाजा तोडून दोन लाख 24 हजार 692 रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चिटपल्ले करीत आहेत.

WhatsAppShare