कंत्राटदाराला कंपनीत भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

52

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – कंपनीत कंत्राटदाराला भेण्यासाठी जात असेलल्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी साडेअकरा वाजता टेल्को कंपनीच्या मेन गेटसमोरील बसस्टॉप जवळ घडली.

वैभव विश्वंभर वाघमारे (वय 19, रा. नेहरुनगर पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे हे सोमवारी सकाळी टेल्को कंपनीतील कंत्राटदाराला भेटण्यासाठी टेल्को कंपनीच्या मेन गेटकडे जात होते. ते कंपनीच्या गेट समोरील बस स्टॉपवर आले असता त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी वाघमारे यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलीस हवालदार आनंद भोरकडे तपास करीत आहेत.