कंडोमचे पाकीट उघडायलाही दोघांची सहमती आवश्यक

455

अर्जेंटिना, दि. ५ (पीसीबी) – अर्जेंटिनामधील एका कंपनीने सुरक्षित शरीरसंबंधांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. ट्युलीपॅन या सेक्स टॉय बनवणाऱ्या कंपनीने बाजारामध्ये एका नवीन पद्धतीचा कंडोम तयार केला आहे. चार हातांनीच या कंडोमचे पाकीट घडले जाते असे या कंपनीने आपल्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंडोमच्या पाकिटाच्या चारही कोनांवर समान दाब दिल्यानंतरच ते उघडेल. शरीरसंबंध ठेवण्यासाठी दोघांची परवानगी असेल तरच या कंडोमचा वापर करता येईल या उद्देशाने अशा प्रकारचे पॅकेजिंग करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘जर होकार नसेल तर नकारच’ अशी या कंडोमच्या जाहिरातीची टॅगलाइन आहे. या वर्षाअखेरीसपर्यंत हा कंडोम बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनी या कंडोमची चाचणी करण्यासाठी अनेक बार्समध्ये या कंडोमचे मोफत वाटप करत आहे. सोशल मिडियावरही या कंडोमची चांगलीच चर्चा आहे.