औरंगाबाद येथे प्रेमयुगूलाची गळफास घेऊन आत्महत्या

92

औरंगाबाद, दि. ३ (पीसीबी) – वैजापूर शहरापासून जवळच असलेल्या रोठीवस्तीत प्रेमीयुगूलाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

सागर राहूल म्हैसमाळे (वय २५) आणि साक्षी बाबासाहेब शेजवळ (वय १८, दोघेही रा. जांबरगाव, ता. वैजापूर, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या प्रेमयुगूलांच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तर सागर हा व्यवसाय करीत होता. वैजापूर शहराजवळील असलेल्या लाडगाव रस्त्यावरील रोठीवस्तीजवळील नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पोटचारीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघेजण आढळले.

दरम्यान, दोघांचेही मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस तपास करत आहेत.