औरंगाबाद महापालिकेत वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या  नगरसेवकाला अटक

874

औरंगाबाद, दि. १८ (पीसीबी) – औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीला विरोध करणारे एमआयएमचे  नगरसेवक सय्यद मतीन यांना अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि.१७) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी चांगलाच चोप दिला होता.  त्यातील आरोपी भाजप नगरसेवक राज वानखेडे, प्रमोद राठोड आणि विजय आवताडे या तिघांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात जोरदार मारहाण केली आणि सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीने यास कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली होती.