औरंगाबाद पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

44

औरंगाबाद, दि. २७ (पीसीबी) –  एमपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने पोलिस उपायुक्तांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप एका २२ वर्षीय तरुणीने औरंगाबादचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर केला आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २२ वर्षीय तरुणीने याप्रकरणाची तक्रार व्हॉट्सअपद्वारे केल्यानंतर, परिमंडळ २ चे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.  उपायुक्त विनायक ढाकणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, २२ वर्षीय तरुणीची आई औरंगाबाद पोलिस दलातच कार्यरत आहे. तर उपायुक्त श्रीरामे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.