औरंगाबाद खंडपीठाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश

218

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून दाखल प्रथम माहिती अहवाल रद्द करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावरून खडसे यांना नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. के.एल. वडणे यांनी १८ जुलै ला दिला आहे.

अंजली दमानिया व इतरांनी संगनमताने तसेच धनादेश चोरून त्यावर खोटा मजकूर लिहून बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून त्याचा गैरफायदा घेतला, अशी तक्रार माजी मंत्री खडसे यांनी १३ जून ला मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून दाखल एफआयआर रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशा विनंतीची याचिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खंडपीठात दाखल केली. त्यावरून न्यायालयाने हा आदेश दिला. या अर्जावर २१ ऑगस्ट २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.