औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरणी मराठा मोर्चाचा संबंध नाही – पोलिस आयुक्त प्रसाद

597

औरंगाबाद, दि. १४ (पीसीबी) –  महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसी येथील कंपन्यांच्या तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.

मराठा आंदोलनात काही बाहेरचे लोक घुसले असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मात्र हे लोक नेमक्या कुठल्या चळवळीशी संबंधित होते याबाबत तपासानंतरच सांगता येईल असेही चिरंजीव प्रसाद म्हणाले. ९ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीत बंद कंपन्यांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती.