औरंगाबादमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघा सख्या भावांचा मृत्यू

211

औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे ट्रकवर घडली.

आकाश बागुल आणि जयेश बागुल असे मृत दोघा सख्या भावांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि जयेश या दोघांचे आज भांडण झाले होते. त्या रागातून मोठा भाऊ आकाश हा मुकुंदवाडी येथील रेल्वे ट्रकवर आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याला आत्महत्या करण्यापासून थांबवण्यासाठी लहान भाऊ जयेश त्याच्या मागे गेला. मात्र आकाश रेल्वे ट्रकवरुन पळूलागला. यावेळी मागून आलेल्या रेल्वेने आकाश आणि जयेश या दोघांना चिरडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. मुकुंदवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.