औरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी बदडले

327

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (शुक्रवारी) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी चांगलेच बदडले.

श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात जोरदार मारहाण केली आणि सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीने यास कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी केली.