औरंगाबादमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन यांच्या समर्थकांनी भाजप नेत्याची गाडी फोडली; ड्रायवरलाही केली जबर मारहाण

349

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून  आज (शुक्रवारी) भाजपाच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली. त्याचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात तुफान दगडफेक  केली असून भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करत चालकाला जबर मारहाण केली आहे.