औरंगाबादमध्ये आंदोलन पेटले; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

137

औरंगाबाद, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी औरंगाबादमध्ये आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले होते. दुपारच्या सुमारास काही आंदोलकांनी वाळूज एमआयडीसीमध्ये कंटेनर पेटवला. तसेच तीन-चार कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली.

यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करुन लाठी चार्जही करावा लागला. यामुळे काही काळासाठी वाळूज एमआयडीसी परिसरात तनावाचे वातावरण होते. मात्र संध्याकाळ पर्यंत आंदोलन शांत झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.