औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना एटीएसने घेतले ताब्यात

374

औरंगाबाद, दि. २१ (पीसीबी) – राज्याच्या एटीएस पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास औरंगाबादमधील पैठण रोड येथे करण्यात आली असून तिघांच्या घरातून संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी शरद कळसकर (वय २९) आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली होती. राज्याच्या एटीएसने ही कारवाई केली होती. सचिन अंदुरेची कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी पहाटे पोलिसांच्या पथकाने औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेच्या तीन मित्रांच्या घराची झाडाझडती घेतली. यातील एकाच्या घरात पोलिसांना हत्यारे सापडल्याचे समजते. तर अन्य दोघांच्या घरातून कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे साहित्य जप्त करण्यात आले. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.