औरंगबादेत बंद असलेल्या ६० कंपन्यांची तोडफोड; २० जण ताब्यात

486

औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – औरंगाबादेत बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागले. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील ६० कंपन्यांचे मोठे नुकसान झाले, तर आणखी छोट्या १० ते १२ कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली. पोलिसांनी तोडफोडप्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलकांनी बंद कंपनीच्या गेटची चावी सिक्युरिटीकडून काढून घेतली. गेट उघडून कंपनीत प्रवेश केला आणि थेट तोडफोड केल्याचे, कंपनीच्या मालकांनी सांगितले.

दरम्यान कालच्या आंदोलनाचा जवळपास ४० कंपन्यांना मोठा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. आंदोलनाच्या निषेधार्थ औद्येगिक वसाहतीतील अनेक कंपन्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत.