औरंगबादेत बंद असलेल्या ६० कंपन्यांची तोडफोड; २० जण ताब्यात

17

औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – औरंगाबादेत बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागले. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील ६० कंपन्यांचे मोठे नुकसान झाले, तर आणखी छोट्या १० ते १२ कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली. पोलिसांनी तोडफोडप्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले आहे.