औरंगजेब देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा – उद्धव ठाकरे

0
555

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – ईदच्या सुट्टीसाठी घरी येणाऱ्या औरंगजेब या ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानाची गुरुवारी दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केली. त्यामुळे संपूर्ण देशात एकच संतापाची भावना आहे. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना औरंगजेबच्या हौतात्म्याला वंदन केले.

औरंगजेबाच्या बेडर आणि निधड्या छातीचे माप किती, औरंगजेबाची छाती किती इंचाची या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण देशातील मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबाच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा. असा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा. या औरंगजेबाचे हौतात्म्य अमर आहे असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे.