औद्योगिक क्षेत्रात राज्याची वाटचाल प्रगतीपथावर – मुख्यमंत्री   

84

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य  असून  जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी सरकारने  प्रयत्न  केले आहेत. त्यामुळेच  संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार  महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रात राज्याची वाटचाल प्रगतीपथावर  सुरू आहे. त्याचबरोबर  समाजात सोहार्दपूर्ण वातावरण कायम राहण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) येथे व्यक्त केले.

७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.