औंध येथील आनंद कांबळे खून प्रकरणी निगडीतून एकाला अटक

80

निगडी, दि. ३ (पीसीबी) – नुकत्याच झालेल्या प्रेम विवाहतील नवऱ्या मुलाची धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. पोलीस तपासात हा खून लुटमारीच्या हेतूने नाही तर प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. महाबळेश्वर पोलिसांनी निगडी ओटा स्कीम येथून एका संशयीत आरोपीला अटक केली आहे.

निखिल मळेकर (रा. निगडी, ओटास्कीम) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली असून त्याच्या सोबत आणखी कोण सहभागी होते याचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि दिक्षा यांचा शनिवार (दि. २६ मे) मोठ्या थाटामाटात प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही त्यांच्या कारने महाबळेश्वरला फिरायला गेले होते. यावेळी आनंद आणि दिक्षा सोबत आणखी एक जोडपे होते. दरम्यान, महाबळेश्वरहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना पसरणी घाटात दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी चोरीचा बनाव करुन आनंदवर धारदार शस्त्राने वार करुन पसार झाले. सोबत असलेल्या जोडप्या समोर  हा प्रकार घडला. त्यांनी त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच आनंदचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलिसांनी निगडी येथे राहणारा संशयीत आरोपी निखिल मळेकर याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान निखील आणि दिक्षा यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच चोरीचा वनाव करुन आनंदची हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असून दिक्षाचा देखील या कटात शामील होती का याची चौकशी करत आहेत.