औंधमध्ये कोयत्याने वार करुन दुध व्यवसायिकाचा खून

0
4615

औंध, दि. १ (पीसीबी) – कोयत्याने सपासप वार करुन एका दुध व्यवसायिक तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना आज (गुरुवार) औंधमधील कस्तुरबा वसाहतीत पहाटे साडेपाच्या सुमारास घडली.  

रोहित जुनवणे (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणातील संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित जुनवणे याचा दुधाचा व्यवसाय असून तो आज पहाटे साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे औंधमधील कस्तुरबा वसाहतीत दुध टाकण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी रोहितवर कोयत्याने सपासप वार करुन खून केला आणि पसार झाले. काही वेळाने स्थानिक नागरिकांना रोहित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यांनी त्वरीत याची माहिती पोलीसांना दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि रोहितला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्ला करणारा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.