ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलँड स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्सवात साजरा

309

चिंचवड, दि.१५ (पीसीबी) – ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलँड स्कूलमध्ये दि.१२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सीए परितोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

खेळामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतूने वंडरलड टीमतर्फे या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते

क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यामध्ये फनी बनी रॅबिट, बॅलन्सिंग गेम, सॅक रेस, बलून ब्लास्ट, फील द बॉटल अशा खेळांचा मुलांनी आंनद घेतला. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन भारती पवार यांनी केले. वनीता सावंत यांनी आभार व्यक्त केले.

WhatsAppShare