ओझर्डे गावाजवळील गावठी दारुची भट्टी उध्वस्त; तळेगाव पोलिसांची कारवाई

222

तळेगाव, दि. १४ (पीसीबी) – ओझर्डे गावाजवळील कंजारवस्ती येथे सरासपणे सुरु असलेली गावठी दारूचीभट्टी तळेगाव पोलिसांनी उध्वस्त करुन १९ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १३) करण्यात आली.

विजय काळू राठोड, रजनी विजय राठोड, यशोदास विजय राठोड, सिमी यशोदास राठोड, मनीषा अनिविवेक राठोड, अनिविवेक विजय राठोड, तुलसी काळू राठोड, सत्यवती तुलसी राठोड, आकाश सुनील राजपूत, सपना आकाश राजपूत, प्रियांका नंदू राजपूत, नंदू आकाश राजपूत, राहुल बाळू राठोड, राजश्री राहुल राठोड, सुरंग शामराव राठोड, शरणशक्ती उर्फ सुजाता सुरज राठोड, राजू शामराव राठोड, सुद्धा राजू राठोड (सर्व रा. कंजारभाटवस्ती, ओझर्डे, ता. मावळ) असे कारवाई करण्यात आलेल्या १९ जणांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील ओझर्डे गावाजवळ कंजारभाटवस्ती येथे घरात आणि आजूबाजूच्या झाडाझुडूपात गावठी दारुची भट्टी सुरु असल्याची खात्रिशीर माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी बुधवारी धाड टाकून ८५० लिटर तयार दारू, ६ हजार २०० लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन असे एकूण सव्वा लाखांचे कच्चे रसायन उध्दवस्त केले. तसेच ही भट्टी चालवणारे, दारु बनवणारे आणि ती वितरण करणाऱ्या १९ जणांवर कारवाई केली आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

WhatsAppShare