ऑस्ट्रेलियात भारतीय महिला डेन्टिस्टचा चाकुने वार करुन खून

342

सिडनी, दि. ६ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या महिला डेन्टिस्टचा चाकुने वार करुन खून केला त्यानंतर तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरुन तिच्याच कारमध्ये ठेवला.  

प्रीति रेड्डी (वय ३२) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतिच्या हत्येसाठी बॉयफ्रेंडवर संशय व्यक्त केला जात आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांना प्रीतिचा मृतदेह बुधवारी सकाळी तिच्याच कारमध्ये सापडला. यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन नरडेची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अवघ्या काही मिनिटांत त्याचा देखील एका अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात त्यानेच आपली कार मुद्दाम एका ट्रेलर ट्रकला धडकवून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, त्यानेच आधी प्रीतिचा खून केला. यानंतर आत्महत्या केली असा संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे, तर प्रीतिच्या मृत्यूच्या पूर्वसंध्येला हे दोघे कथितरित्या एका हॉटेलात थांबले होते. त्यानंतर प्रीति बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडला.

 

WhatsAppShare