ऑस्ट्रेलियात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधानांवर महिलेने फेकल अंड

107

ऑस्ट्रेलिया, दि. ८ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियातील निवडणुकीला जवळपास एक आठवडा शिल्लक असताना पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांच्यावर अंड फेकण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) प्रचारादरम्यान घडली. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिला संघटनेच्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मॉरीसन सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका महिलेने अचानक त्यांच्यावर अंड फेकले. पंतप्रधानांचा अशाप्रकारे विरोध करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, अंड फेकणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.