ऑर्केस्ट्रामधील गायिकेवर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

82

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : ऑर्केस्ट्रामध्ये गायिका म्हणून काम करण्यास बोलावून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या ऑर्केस्ट्रा चालकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 पासून 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला.

बाळू शिवाजी गव्हाणे (वय-55, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा ऑर्केस्ट्रा आहे. त्याने फिर्यादी यांना ऑर्केस्ट्रामध्ये गायिका म्हणून काम करण्यास घेतले. त्यांच्याशी जवळीक वाढविली. कार्यक्रमाला बोलावून घेऊन लग्नाचे आमिष दाखवत हिंजवडीतील लॉजवर घेऊन जात जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. याचे फोटो आणि व्हिडीओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच वारंवार शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

WhatsAppShare