ऑपरेशनसाठी आसामवरून आलेल्या गेस्ट डॉक्टरच्या सोन्याच्या बांगड्या दवाखान्यातून लंपास

0
164

कृष्णानगर, दि. ९ (पीसीबी) – दवाखान्यात ऑपरेशन करण्यासाठी आसाम येथून आलेल्या गेस्ट डॉक्टर महिलेच्या दोन सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजता कृष्णानगर येथील एका रुग्णालयात घडली.

फरझाना हलीम उद्दीम अहमद (वय 32, रा. आसाम) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर आसाम येथून कृष्णानगर चिखली येथील एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आल्या होत्या. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या दवाखान्यात आल्या. त्यांनी त्यांची बॅग गेस्ट रूममध्ये ठेवली. त्यात त्यांनी त्यांच्या एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या देखील काढून ठेवल्या. त्यांनतर फिर्यादी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या. दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बॅगमधून दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.