ऑक्सफर्डने तिसऱ्या टप्प्यातील ‘करोना-लस’ चाचणी का थांबवली?

41

लंडन, दि.०९(पीसीबी) : करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लस विकसित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक अपेक्षा असलेल्या ऑक्सफर्ड – अॅस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी थांबवण्यात आली आहे. एका स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साइड इफेक्ट आढळून आले. त्यानंतर चाचणी स्थगित करण्यात आली.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या लशीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. भारतातही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

WhatsAppShare