ऐकावे ते नवलच: मदत केल्याने तरुणीने मानले तरुणाचे आभार; तरुणाने थेट घेतले चुंबन

239

पुणे, दि. १५ (पीसीबी) – पुण्यातील कॅम्प परिसरात एका २१ वर्षीय तरूणीचा रस्ता चुकला, त्यात तिचा मोबाईलही बंद पडला. यामुळे तरुणीने रस्त्यात चुकल्याची माहिती देण्यासाठी तेथील एका मुलाचा मोबाईल घेतला आणि मित्राला चुकल्याची माहिती दिली.

बोलने झाल्यानंतर मोबाईल परत देत तरुणीने तरूणाचे आभार मानते. त्यासाठी शेकहँड करण्यासाठी तिने हात पुढे केला. मात्र, त्यावेळी त्या तरूणाने तिचा हात पकडला आणि चक्क तिचे चुंबन घेतले आणि पसार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी तरुणी ही बालेवाडी परिसरातील रहवासी असून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. पोलिस आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरुन त्याचा शोध घेत आहेत.