ऐकत नसतील तर जो मालक, मॅनेजर,ग्रुप लीडर त्यांना पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा – रुपाली ठोंबरे

241

पुणे,दि.२१(पीसीबी) – ज्या कंपन्या बंद केल्या जात नाहीत त्या ऐकत नसतील तर जो मालक, मॅनेजर,ग्रुप लीडर त्यांना पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा, असं मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्वाच्या शहरात अंक्षतहा: लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र काही व्यावसायिक, कंपनीचे मालक आणि मॅनेजर बंद न करता कंपन्या चालू ठेवत आहेत. अशांवर कारवाई करण्याचं आवाहन रूपाली ठोंबरे यांनी केलं आहे.

“पुण्यातील हिंजवडी,खराडी ,वाघोली मध्ये काही कंपनी मुदाम चालू ठेवल्या आहेत ३०० ते ८०० लोक काम करत आहे .कंपनी त्वरित बंद करा. आणि ऐकत नसेल तर जो मालक,मॅनेजर,ग्रुप लीडर त्यांना पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा. खबरदारी साठी बंद म्हणजे बंद” असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.