एस टी वसाहती मधील कर्मचाऱ्यांना महापौर माई ढोरे यांच्या कडून अन्नधान्य किटचे वाटप

88

चिंचवड, दि.२६ (पीसीबी) :- राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आई मुलाला अडचणीत बघू शकत नाही त्याचप्रमाणे महापौर माई ढोरे यांनी सांगवी येथिल एस टी वसाहती मधिल कर्मचाऱ्यांना जिवानवश्यक वस्तु व अन्नधान्याच्या किटचे वाटप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शना मध्ये केले आहे.

यावेळी श्री.जवाहर ढोरे,श्री.गणेश काची,साहिल पाचूपते,समीर पठाण,अमेय पोरे, राहुल गवारी,राहुल बांधलं,ऋषभ काची,केयूर चौव्हाण, जे.डी.ग्रुप व सांगवी प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे बैठका होऊनही तोडगा निघत नाही. आज (दि २५) महापौर माई ढोरे यांनी आंदोलन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्कशॉपमध्ये भेट घेऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी एसटी आगारातील प्रमुखाची भेट घेतली. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. राज्य परिवहन मंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी ते आंदोलन करत आहेत. आंदोलन करत्यांना निलंबित करून आपण त्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहात. आंदोलन करत्यांना निलंबित न करता लोकशाही मार्गाने राज्य सरकार विरोधात आंदोलन करू द्या असे महापौर माई ढोरे यांनी आगार प्रमुखांना सांगितले.