एसटी संपावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या- उद्धव ठाकरे

81

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – एसटी संपाच्या वेळी बडतर्फीची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केले आहे. एक हजार १० कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन नोकरीवर रुजू करुन घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. युनियनबाजीतून तरुण कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि त्यातच त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. उदार मनाने त्यांना माफ करा आणि त्यांच्या चुका पोटात घाला, अशी मागणी बडतर्फीची कारवाई झालेल्या एक हजार दहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली.