एसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा

73

बुलडाणा, दि. १८ (पीसीबी) – ‘एसटी महामंडळातील कामगारांच्या वेतनात नुकतीच भरभरून वाढ केली. ही वाढ कोणत्या युनियनचा मंत्री आहे म्हणून नव्हे, तर सर्व कामगारांचा मंत्री म्हणून केली. आता या कामगारांच्या दहावी-बारावीत शिकणाऱ्या मुलांच्या खात्यात दरमहा ७५० रुपये टाकण्याचा महामंडळाचा प्रयत्न अाहे, जेणेकरून ताे शिक्षण घेताना स्वत:चा खर्च भागवू शकेल,’ अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.