एल्गार परिषद प्रकरण: पाचही आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैद

116

दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवावे, असे  आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए एम खानविलकर आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली. तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने सांगण्यात आले की, याचिकाकर्त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांवरुन आरोपींच्या कटाचे गांभीर्य लक्ष येते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पाचही आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, बुधवारी झालेल्या सुनावणीत पाचही आरोपींना नजरकैद करण्याऐवजी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिल्याने पोलिसांना धक्का बसला आहे.