एल्गार परिषद प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली; उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले

178

पुणे, दि. ३ (पीसीबी) – एल्गार परिषद प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली, असा सवाल विचारुन मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले आहे. एल्गार परिषदेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेची सुनावणी आज (सोमवार) पार पडली.

या याचिकेमध्ये गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये केलेल्या कारवाईचा तपास पोलिसांना करता येत नाही, त्यामुळे हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करावे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. मात्र सुनावणी दरम्यान सर्व प्रतिवादींना याचिकेची प्रत मिळू न शकल्याने सुनावणी ७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांनाही फटकारले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही पत्रकार परिषद का घेतली, असा सवाल हायकोर्टाने विचारला.