एम्पायर इस्टेटजवळ दापोडी-निगडी बीआरटी मार्गात बस बंद पडली

107

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – जुना मुंबई-पुणे मार्गावरील एम्पायर इस्टेट येथील दापोडी-निगडी बीआरटी मार्गात बस बंद पडली. आज (रविवार) सायंकाळी ५ च्या सुमारास बस अचानक बस बंद पडल्याने या मार्गावरील इतर बस थांबून राहिल्याने प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले.

दरम्यान, काही दिवसापूर्वी या मार्गावर महापालिका भवनसमोर बस बंद पडली होती. आता  एम्पायर इस्टेट येथे बस बंद पडल्याने पीएमपीचे ढिसाळ नियोजनाचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.