एमआयडीसी भोसरी पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा..

106

भोसरी. दि. २९ (पीसीबी) – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा घालून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महात्मा फुले नगर येथे बुधवारी (दि. 28) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

कैलास निवृत्ती बोराटे (वय 43, रा. महात्मा फुलेनगर, मोशी), प्रशांत तुकाराम नाईकडे (वय 38, रा. अरुणनगर, मोशी), बाळू किसन गायकवाड (वय 50, रा. लक्ष्मीनगर, मोशी) आणि गंगाधर पूमाजी कर्णे (वय 60, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी नितीन आप्पा खेसे यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर, मोशी येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास छापा घालून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून 18 हजार 885 रुपयांचे साहित्य जप्त केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare