‘एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे’ पुन्हा जर टीका केली तर मनसे स्टाइलने दणका देऊ

190

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या टीकेने मनसे नेते संतापले असून एमआयआमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा जर टीका केली तर मनसे स्टाइलने दणका देऊ आणि तो कसा असतो ते अबू आझमी यांना विचारा, असेही म्हटले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबतचा व्हिडिओ मनसेच्या अधिकृत ट्विटर पोस्ट केला आहे.

WhatsAppShare