एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता

186

औरंगाबाद, दि.९ (पीसीबी) – एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे.

धर्माच्या नावावर मतं मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात  आली आहे.

प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची कलमे लपवणे आणि खर्चाचा हिशोब न मांडणे या कारणावरून याचिका दाखल करण्यात आल्याचं समजतंय.

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं.