एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी नॅनोरोबोट विकसित

64

पुणे, दि. ३ (पीसीबी) :“अभिसरण ट्यूमर पेशी कॅप्चर आणि विलगीकरण करतो असा नॅनोरोबोट तयार करण्यात आला आहे. यामुळे कर्करोगाच्या निदानासाठी नवीन जलद आणि अचूक निदान करणे सहज शक्य होईल. असे मत तळेगाव-दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्रीय संशोधन प्रयोग शाळेतील प्रसिध्द शास्त्रज्ञ प्रा.डॉ.शाश्‍वत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ शाश्‍वत बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (MIMER) वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेत हा नॅनोरोबोट विकसित केला आहे.
प्रा.डॉ. शाश्‍वत बॅनर्जी म्हणाले, ICMR अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे १.१ दशलक्ष नवीन कर्करोगाची प्रकरणे नोंदवली जातात. जगभरातील कर्करोगाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) यांनी नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, २०२५ पर्यंत देशातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या १५.६ लाखांवर जाईल. म्हणूनच कर्करोगाचा प्रतिबंध आणि उपचार हे २१व्या शतकातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान आहे.

प्रा.डॉ.बॅनर्जी पुढे म्हणाले, कर्करोगाच्या आजाराची स्थिती निश्‍चित करण्यासाठी सध्या बायोप्सी आणि त्यानंतर अनुवांशिक आणि प्रोटीओमिक विश्‍लेषण केले जाते. कर्करोगाच्या आजाराची स्थिती निश्‍चित करणे आणि उपचारपध्दती निवडणे यासाठी नवीन प्रणाली विकसित करण्यावर जगभरातील शास्त्रज्ञांचा भर आहे. रोग संक्रमणातील प्रगत टप्पा गाठलेल्या कॅन्सरचे विश्‍लेषण प्राथमिक रूग्णालयात सहज शक्य होत नाही. याउलट लिक्विड बायोप्सी बरेच फायदे आहेत. जसे अचूक आणि विशेषतः रियल टाईम निदान होणे हे भविष्यात टिश्यू बायोप्सीची जागा घेऊ शकते. लिक्विड बायोप्सी मध्ये सध्या परिचालित ट्यूमर पेशी ज्या नॉन-इनवेसिव्ह प्रक्रियेद्वारे विलग केलेल्या आहे. अशा पध्दतीचा त्यात समावेश आहे.

प्रगत संशोधनासाठी केंद्र सरकारकडून एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेला जवळपास १ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच कम्युनिकेशन्स केमिस्ट्री (नेचर पब्लिशिंग ग्रुप ) या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. कम्युनिकेशन्स केमिस्ट्री हे नेचर पब्लिशर्स प्रतिष्ठित पीअर रिव्हू जर्नल आहे.

प्रा.डॉ.शाश्‍वत बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी अभिनंदन केले.