एनपीआर आणि एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही – नवाब मलिक

104

मुंबई,दि.२८(पीसीबी) – नागरिकत्वा दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत नसून, तो अधिकार नसून तो अधिकार केंद्राकडे आहे. हा विषय आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगत राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही, असा इशारा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी बिहारमधील संयुक्त जनता दल, भाजप युतीच्या सरकारने मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणेच महाविकास आघाडीच्या सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अधिवेशनात तसा ठराव मंजूर करुन घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली. त्याचबरोबर याविरोधात महाराष्ट्रात एनआरसी लागू करु देणार नाही, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतली आहे.

दरम्यान, एनआरसी लागू करणार नाही असे सांगून भाजपने भूमिका बदलली. मात्र याबाबत सरकारने आणि आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना जे अपेक्षित आहे ते आम्ही लागू होऊ देणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.