एटीएमची अदलाबदल करून 81 हजार रुपयांचा अपहार

72

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – एटीएम सेंटरमध्ये मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा गोपनीय क्रमांक पाहून तसेच एटीएम कार्डची अदलाबदल करून अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातून 81 हजार रुपये काढून अपहार केला. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी साडेदहा वाजता शांताई सिटी, तळेगाव दाभाडे येथे एसबीआय बँक एटीएम सेंटरमध्ये घडली.

सुभाष रामकृष्ण भोपे (वय 81, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोपे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता शांताई सिटी, तळेगाव दाभाडे येथे एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी गेले होते. मिनी स्टेटमेंट काढत असताना फिर्यादी यांचा गोपनीय पिन क्रमांक आरोपीने बघितला. त्यानंतर आरोपीने चलाखीने फिर्यादी यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून त्यांच्या बँक खात्यातून 81 हजार रुपये काढून त्याचा अपहार केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare