एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून

1235

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून झाल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नवी मुंबईतून एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहत होते. ते बुधवारी (दि.५) रात्री ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिले होते. मात्र, ते घरी पोहोचले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा फोन लावून चौकशी करण्‍याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन स्वीचऑफ येत होता.

त्यानंतर एन.एम.जोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता त्यांना शुक्रवारी (दि.६) संघवी यांची रक्ताने माखलेली कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात सापडली. त्याचवेळी पोलिसांना संघवी यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्याची कसून चौकशी केली जात आहे.